भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना पॉझिटीव्ह

पुणे


पुणे,दिनांक ५ जुलै
भारतीय जनता पार्टीचे हडपसर,पुणे विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार योगेश टिळेेेेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.भाजपाच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणीत योगेश टिळेकर यांना ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.

माजी आमदार टिळेकर यांनी ट्विट द्वारे सांगितले की, दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची  ची तपासणी करून घेतली असता तपासणी अहवाल पॉसिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित रहावे.


 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *