कु. संस्कृती रमेश वाठोरे हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

विदर्भ

· ग्रामीण खुला संवर्गातून निवड

पुसद| राजेश ढोले,दिनांक ५ जुलै

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय दिल्ली मार्फत जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत पुसद शहरातील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलची कु. संस्कृती रमेश वाठोरे या विद्यार्थिनीने ग्रामीण खुला संवर्ग या प्रवर्गातून यश प्राप्त केले आहे.तिला सौ प्रियंका बघेल, सुमित बघेल, रिता बघेल यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

तिच्या या यशाबद्दल सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर सायनी, तिचे आई-वडील, काका संजय वाठोरे, गणेश वाठोरे, बाळासाहेब वाठोरे,राजेश ढोले, लक्ष्मण कांबळे आदिंनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *