तळोद्यातील कॉलेज तरुणांचा संगीत क्षेत्रात डंका

मनोरंजन

· रोहित मगरे, भावेश सूर्यवंशीच्या गाण्यांची सोशल मीडियावर धूम

शिरपूर, दिनांक 6 जुलै

संगीत क्षेत्रातील कोणताही वारसा नसताना तळोदा शहरातील माळीवाडा परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांनी स्वतःचे “यमराज  प्रोडक्शन” निर्माण करून संगीतबद्ध व गायलेल्या गाण्यांनी सोशल मीडियावर धूम केली आहे. त्यांच्या गाण्यांना उत्स्फूर्तत प्रतिसाद मिळाल्याने खानदेशातील मातीचा कलात्ममक सुगंध चौफेर दरवळत आहे.

मूळ तळोदा शहरातील भावेश महेश सूर्यवंशी हा शिरपूर शहरातील आर सी पटेल फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर रोहित दगुलाल मगरे हा तरुण शिरपूर शहरातच आरसी पटेल महाविद्यालयात अंतिम वर्षाला आहे. या दोघा तरुणांना संगीत क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक वारसा नाही. मात्र गाण्याची आवड असल्याने त्यांनी स्वतःचे “यमराज प्रोडक्शन” हाऊस सुरू केले. नव्या-जुन्या हिंदी  – मराठी गाण्यांच्या छोट्या छोट्या चालींवर सराव करून त्यांनी धाडस पत्करून गायनाच्या क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले. भावेश सूर्यवंशी यााने या गाण्यांना कंपोज व संगीतबद्ध केले. रोहित मगरेे याने आपल्या सुमधूर आवाजाने गाण्याला न्याय दिला आहे. आतापर्यंत या तरुणांनी “बस एक बार”,“ये आयना”, “बेखयाली”,“आवाराा शाम”,“आपकी नजरोने” असे पाच गाणे संगीत बद्दल व गाऊन तयार केले आहेत. यााा गाण्यांना सो मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने खानदेशाच्या मातीची कलात्मक ओळख अधोरेखित झाली आहे.

भावेश सूर्यवंशी व रोहित मगरे या तरुणांना त्यांच्या संगीतमय प्रवासासाठी हितांशू मगरे, रोहित पाटील, विशाल गायकवाड,जय चव्हाण, अमोल मोहिते यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *