यवतमाळ जिल्हा भीम आर्मीची कार्यकारणी जाहिर

विदर्भ

•जातीय अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा तीव्र करण्याचा संकल्प

*यवतमाळ जिल्हा भीम आर्मी संघटनेचे कार्यकारणी जाहिर*

*जातीय अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपला लढा तीव्र करावा नवीन कार्यकर्त्यांना संदेश*

… ऑनलाइन दिला भीम आर्मी प्रमुख यांनी संदेश

पुसद | राजेश ढोले, दिनांक ६ जुलै

पुसद येथे नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे भीमआर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी जिल्हा महासचिव म्हणून अशोक भालेराव,जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून आकाश सावळे, जिल्हा कमांडो म्हणून बुद्धरत्न भालेराव,जिल्हा सरचिटणीस धनराज कांबळे व जिल्हा सचिव शेख सलीम शेख कय्यूम,तसेच तालुका संघटक म्हणून मोहम्मद अज़ीम शेख व शहर संघटक सूरज कुरील ने(मोची समाज), शहर युवा अध्यक्षपदी गोपाल जगताप या सर्वांचा नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

अन्याय अत्त्याचारा विरुद्ध एकत्रित येऊन संविधानिक मार्गाने लढ़ा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे भीमआर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ जगताप यांनी यावेळी मत व्यक्त केले.यावेळी बाबू भाई ठेकेदार यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहम्मद अज़ीम शेख यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला जिल्ह्यातीलअसंख्य भीम सैनिकांनी हजेरी लावली होती. कार्यकर्माच्या शेवटी मोची समाजाचे नेते सूरज कुरील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *