पिंप्रीत उद्यापासून तीन दिवसीय जनता कर्फ्यू

जळगाव

 

धरणगाव,दिनांक ६ जुलै

धरणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पिंपरी खुर्द गावात उद्या मंगळवार दिनांक ७ जुलै पासून गुरुवार दिनांक ९ जुलै पर्यंत तीन दिवसीय जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतच्या कोरोना नियंत्रण समीती, व्यवसायिक बांधव व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वयंपूर्तीने जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .या बंद काळात गावातील फक्त किराणा दुकान , मेडिकल व कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील. तसेच दुध डेअरी सकाळी व संध्याकाळी ७ ते ९ पंर्यतच सुरू राहिल . या व्यतरिक्त सर्वच व्यावसाईक दुकाने उदया दिनांक ७ जूलै पासून तीन दिवस कडकडीत बंद राहतील . या काळात वरील व्यतिरिक्त ज्या व्यावसायिकांचे दुकाने उघडी आढळल्यास त्यांच्यावर प्रशासनातर्फे कलम १८८ अन्वये कारवाई व गुन्हें दाखल करण्यात येणार आहे .

 मंगळवारी गाव बंद


“मंगळवार हा बाजाराच्या दिवस असतो. शासनाच्या आदेशानुसार बाजार बंद असुन त्या दिवशी गावात बाहेरून येणारे व्यावसाईक व परिसरातील सर्वच गावातील खरेदी करणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ होते. ही बाब लक्षात घेता दर मंगळवारी गावातील सर्वच दुकाने ३० जुलै पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.”

ग्रामस्थांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नये. प्रत्येकाने तोंडाला मास्क किवा रुमाल बांधणे सक्तीचे आहे .विना मास्क कुणी आढळल्यास त्यांना दंड करण्यात येणार आहे .  गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या हितासाठी सर्वानी या तीन दिवसीय जनता कर्फ्यूस व दर मंगळवारी गाव बंद यास सहकार्य करावे  असे आवाहन ग्रामपंचायतच्या कोराना नियंत्रण समिती , व्यापारी ,व्यावसाईक बांधव व ग्रामस्थांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *