प्रहार जनशक्तीचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केला साजरा

विदर्भ

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, औषधी वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन

उमरखेड|अथर खतीब,दिनांक ७ जुलै

“ महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण ,महिला व बालविकास राज्यमंत्री,प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, औषधी वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.”

उमरखेड शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोलीस स्टेशन उमरखेड येथील कर्मचारी यांना होमिओपॅथिक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.

ढाणकी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. नांदेड येथील गुरुगोविंद सिंग रक्तपेढीचे डॉ.कानकंदडे ,आनंद लोंढे,भुवनेश्वर माचाळ, उद्धव मुळे यांच्या पथकाने रक्तदान शिबिराला सहकार्य केले.

बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित  करण्यात आलल्या  विविध कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड तालुका प्रमुख  शेख माजित, राहुल मोहितेवार,राजू गायकवाड ,सावन हिंगमिरे, अंकुश पानपट्टे ,विवेक जळके, अभिजित गंधेवार, सय्यद जमीर, अतिक खतिब आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *