राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने केला साजरा

जळगाव

– जळगाव ग्रामीणमध्ये संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद राठोड यांनी केले अन्नधान्य किट,औषधी व मास्कचे मोफत वितरण

“ खडके सिम तालुका एरंडोल येथे शरद जोशी विचारमंच  शेतकरी  संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद राठोड यांनी आदिवासी कुटुंबांना १० किलो तांदूळ,१ किलो तूरडाळ, प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथी गोळ्या आर्सेनिक अल्बम ३० चे मोफत वाटप केले. ”

जळगाव, दिनांक ७ जुलै

सर्वसामान्य शेतकरी व कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आग्रही भूमिका मांडणारे, प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव ग्रामीण मध्ये शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेने विविध उपक्रम राबविले.

शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार राजे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.गजेंद्र पाटील, प्रदेश सहसचिव तथा जळगाव जिल्हाध्यक्षा मालती प्र. पाटील, डॉ. रुपाली पाटील, शहर जिल्हा अध्यक्षा लता पाटील यांच्या सहकार्यातून बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. खडके सिम तालुका एरंडोल येथे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद राठोड यांनी आदिवासी कुटुंबांना आठवडाभराचे अन्नधान्य किट, आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या त्यांचे मोफत वाटप करून प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *