आषाढी पौर्णिमेनिमित्त महालक्ष्मी नगर काकडदाती येथे बुद्ध प्रतिरूपाची स्थापना

विदर्भ

· धम्म उपासकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून केले वृक्षारोपण

पुसद|राजेश ढोले,दिनांक ७ जुलै

शहरालगत असलेल्या काकडदाती ग्रामपंचायत अंतर्गत महालक्ष्मी नगर येथे आषाढी पौर्णिमेचे औचित्य साधून बौद्ध धम्म उपासक-उपासिका यांनी तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिरूपाची स्थापना करून वृक्षारोपण केले.

यावेळी बुद्ध मूर्ती दान करणाऱ्या वर्षा नगर, काकडदातीच्या रहिवाशी कमल ताई भगत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेल्या भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले.

“आषाढी पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान बुद्ध यांनी भिख्खुंना पहिला धर्मोपदेश केला. हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून ओळखला जातो. सर्वांनी एकसंघ होऊन समाजासमोर आदर्श निर्माण करावा.”                                                                                    – किशोर कांबळे

          कार्यक्रमात सामूहिक धम्म वंदना घेण्यात आली. यांना भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपासकांना संबोधित करताना त्यांनी आषाढी पौर्णिमेचे महत्व विशद केले. आषाढी पौर्णिमेला वर्षावासाची सुरुवात होत असल्याने विहारात जाऊन श्रावण करून भिख्खूंना भोजनदान करा.

कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष अॅड. रवी वाघमारे,सचिव अरुण ढोले, उपाध्यक्ष गौतम शिंदे व कोषाध्यक्ष अरुणा सूर्यवंशी ,संयोजक गौतम वाघमारे सर यांनी केले. कार्यक्रमाला पांडुरंग ढोले, सिद्धार्थ शापाने, मुकिंदा ढोले, पांडुरंग गायकवाड , विनोद ढोले , अरुण ढोले , गौतम शिंदे, प्रशांत शिंदे, अॅड. हर्षवर्धन बलखंडे, संतोष जोगदंडे, विठ्ठल ढोले, विलास सुर्यवंशी , रवी वाळके सर, नितीन नरवाडे अक्षय भालेराव ( पत्रकार) भवन कांबळे, आयुष्यमती शांताबाई ढोले, गिरजा शापाने, राधाबाई कांबळे, विजय ढोले,अरुणा सूर्यवंशी, राजकन्या वाघमारे, नेहा वाघमारे, अनिता जोगदंडे, नूतन ढोले ,वर्षा ढोले, विशाखा ढोले, अनिता थोरात, ज्योती शिंदे, राणी शिंदे, स्मिता सोनवणे, प्रज्ञा बलखंडे, कांचन ढोले, अर्चना ढोले , संगीता कांबळे, साधना कांबळे मनिषा नरवाडे यांची प्रामुख्याने उपस्थिति होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *