तळोद्याच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ. एस. आर. मगरे

नंदुरबार

तळोदा |प्रतिनिधी, दिनांक ७ जुलै

येथील अ. शि.पाटील मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. एस. आर. मगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रा. डॉ. एस. आर. मगरे यांनी प्राणिशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून १९९१ साली गोगलगाय या संशोधन विषयात त्यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. सन १९९२ साली ते तळोदा महाविद्यालयात व्याख्याता म्हणून रुजू झाले.प्रपाठक, संशोधन मार्गदर्शक, प्राध्यापक अशी त्यांचा  व्याख्याताा म्हणून प्रवास झाला आहे.

२९ वर्षांच्या अखंड सेवेत त्यांनी एकूण ९४ संशोधनात्मक पत्रिका लेखन केले आहे. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीचे  तीन लघु संशोधन प्रकल्प व एक मेजर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. त्यांनी सातपुड्यातील सुमारे २०० विविध सजीवाचा अभ्यास केला असून संशोधन व अभ्यासासाठी थायलँड, मलेशिया व नेपाळ देशांना भेट दिली आहे.

त्यांची महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपदी‌ नि


युक्ती झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *