राजगृहावर हल्ला प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा-पुसदच्या आरपीआय (आठवले)ची मागणी

विदर्भ

पुसद| राजेश ढोले, दिनांक ९ जुलै

मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह बंगल्यावर ७ जुलै रोजी झालेल्या हल्ल्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुसद येथील आरपीआय (आठवले) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात पुसद येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या मुंबई येथील राजगृहावर दिनांक ७ जुलै रोजी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची, कुंड्याची व खिडक्यांच्या काचेची तोडफोड करण्यात आली.तसेच घरांच्या खिडक्यांच्या काचा वर दगडफेक करण्यात आली आहे.यात घराचे फार मोठे नुकसान झाले आहे.हा हल्ला केवळ राजगृहावर नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या विचारांना मानणाऱ्या जगातील संपूर्ण अनुयायी व बौद्ध समाजाच्या हृदयावर झालेला हल्ला आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास स्थान असून त्यांनी हे घर पुस्तकासाठी  बांधले होते. जगातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेट देत असतात.  आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. दिनांक ७ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरूने हा प्रकार केला. यात त्यांनी घरातील सीसीटीव्हीचे मोठे नुकसान केले या प्रकरणात पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याचे वृत्त होते. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहेत.

यातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी व संपूर्ण घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच मुंबई येथील राजगृहाला शासनाच्यावतीने २४ तास पोलिस सुरक्षा प्रदान करण्यात यावी या आशयाचे लेखी निवेदन  उपविभागीय अधिकारी पुसद यांचे मार्फत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

निवेदनावर बाळासाहेब लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, प्रा. अंबादास वानखेडे, प्रकाश धुळे, भीमराव गणपत कांबळे, अमर पाटील, प्रा. मोहम्मद आरिज, जयराम माथने, शंकर कांबळे, शुभम वाकोडे, दिलीप धुळे, दिलीप कांबळे इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *