खिरवड येथे सात दिवसांचा जनता कर्फ्यू , नागरिकांनी सहकार्य करावे-ग्रामपंचायतीचे आवाहन

जळगाव

 


रावेर|नजमोद्दिन शेख, दिनांक १२ जुलै

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा कहर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जळगाव जिल्ह्याने तर कोरोनाच्या वाढत्या मृत्यूदरामुळे संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ४०० पार झाला आहे. रावेर तालुक्यातील खिरवड गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने गावात सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने जाहीर केला आहे.

“ सोमवार, दिनांक १३ जुलै पासून ते रविवार, दिनांक १९ जुलै पर्यंत सात दिवसांचा जनता कर्फ्यू  खिरवड ग्रामपंचायत हद्दीत लागू करण्यात आला आहे. सरपंच निळकंठ चौधरी, उपसरपंच विनोद चौधरी, ग्रामसेवक श्री एच. डी. शिरसाठ यांनी खिरवड गावात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी  गावात जनता सात दिवसांचा जनाता कर्फ्यू लागू करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक तत्पूर्वी गावातील काही नागरिकांची मते जाणून घेत जनता कर्फ्यू लागू करण्याच्या ग्रामपंचायतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.”

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी जनता कर्फ्यूचे  तंतोतंत  पालन करून घरीच सुरक्षित रहावे, अनावश्यक गावात फिरू नये व गावाचेे आरोग्य सुरक्षित ठेवावे असे आवाहन सरपंच निळकंठ चौधरी, उपसरपंच विनोद चौधरी, ग्रामसेवक श्री एच. डी. शिरसाठ व ग्रामपंंचायत सदस्यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *