“त्या” नराधमाच्या मुसक्या आवळणारे पोलिस कौतुकास पात्र ; आरोपी सात दिवसांच्या पोलीस कोठडीत

क्राइम जळगाव


भोले भक्त आरोपीची विकृत मानसिकता

♦  कचरा वेचणाऱ्या मुलांची आखोदेखी ठरली पोलीस तपासात मोठा दुवा


जळगाव, दिनांक १३ जुलै

“ भिक्षा मागणाऱ्या दहा वर्षाच्या मुलीवर खाऊचे आमिष दाखवून भरदुपारी गोलाणी मार्केटमध्ये नेेत  लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध घेताना कचरा वेचणाऱ्या मुलांची आखोदेखी पोलीस तपासात महत्त्वाचा दुवा ठरले. कोणतीही धागेदोरेे गवसत नसतांना बारकाईने तपास करणाऱ्या पोलिसांनी घटनेच्या खोलवर जाऊन केलेला तपास कौतुकास पात्र आहे.”

शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर दहा वर्षाच्या निरागस अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा सौरभ खर्डीकर याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्याने “तो मी नव्हेच.. ” असा पवित्रा घेतला. पण कचरा वेचणाऱ्या मुलांनी ठामपणे त्याच्या विकृतीची आखोदेखी त्याच्या समोर पोलिसांना सांगताच नराधमाने केलेल्या कृत्याची कबुली दिली.
सौरभ खर्डीकर हा सैतानी मानसिकतेचा विकृत नराधम भोले भक्त आहे. त्याने भिक्षा म्हणून पीडित अल्पवयीन मुलीला पाच रुपये देऊन खाऊ देतो असे म्हणून सोबत नेल्याची कबुली वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर दिली आहे.
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी जळगाव शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट आहे. याचा गैरफायदा उचलत निर्मनुष्य झालेल्या गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर भिक्षा मागणाऱ्या निरागस दहा वर्षाच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून मुतारीत लैंगिक अत्याचार करणारा नराधम बिनधास्त होता. पीडित मुलगी भिक्षा मागणारी असल्याने वाच्यता होणार नाही या ठाम विश्वास असलेल्या नराधमाला शोधून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, सहाय्यक पोलिस अधिक्षक नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात दांडगा जनसंपर्क असलेल्या ११ पोलिसांचे पथक नेमले. विजयसिंह पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अनिल इंगळे, संतोष मायकल, अशरफ शेख, रामचंद्र बोरसे, रमेश चौधरी, मनोज दुसाने यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने गोलाणी मार्केट मधील एका वकिलाच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका युवकाच्या मागे लहान मुलगी चालत असल्याचे चित्रित झाले. हा क्लु मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाची ओळख पटविण्यासाठी त्याचे फोटोचे स्केच काढले. या स्केच वरूनच कचरा वेचणाऱ्या मुलांनी पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती देत आखो देखी सांगितली. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी थेट कानळदा रस्त्यावर असलेले राधाकृष्ण नगर गाठले. याठिकाणी घरात वडिलांसोबत जेवण करत असताना नराधम आरोपी सौरभ वासुदेव खर्डीकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याविरुद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला न्या. आर.एन. हिवसे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपासातील बाबी व पुरव यांचे संकलन करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *