कोरोना : पिंप्री गावासह बाजारपेठ मंगळवार पर्यंत बंद

जळगाव


धरणगांव,दिनांक १३ जुलै

 

तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या व  आतापर्यंत सुरक्षित असलेल्या  पिंप्रीत कोरोनाच्या पहिला रूग्ण आढळला . त्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून घेण्यात आले असून त्या व्यक्तींना धरणगाव सेंटरला पाठविण्यात आले आहे. त्या संशयित व्यक्तींचे स्वॅबच्या तपासणी अहवाल येई पर्यंत म्हणजेच दिनांक १४ जुलै मंगळवार पर्यंत पिंप्री गावासह बाजारपेठ बंद ठेवण्याच्या निर्णय वरिष्ठांच्या आदेशान्वये ग्रामंपचायतसह व्यापारी व ग्रामंस्थानी  घेतला आहे.
रुग्ण राहत असलेली गल्ली व त्या परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने  हायड्रोक्लोराईडची फवारणी करुन तो पारिसर बंदिस्त करण्यात आला आहे.
परिसरातील गावांमध्ये देखिल कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे . या आजाराच्या ससंर्ग रोखण्यासाठी गावातील व्यापारी व लहान- मोठ्या सर्वच व्यवसाईक , ग्रामस्थांनी व खास करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या जेष्ठ श्रेष्ठ मंडळी व युवकांनी या बंदला सहकार्य करत सुरक्षित रहावे , नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे आवाहन ग्रामपंचायतच्या कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *