धरणगावचा ॲम्बुलन्स चालक “बंडू” भाऊंचा भारत मुक्ती मोर्चा करणार सन्मान

जळगाव

 

 

 

 

धरणगाव, दिनांक १३ जुलै

संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंचा कहर भारतातही गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसत आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली आले असताना कोरोना योद्धे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ठामपणे रुग्णसेवा करीत आहेत. अशाच कोरोना योद्धांमध्ये ॲम्बुलन्स चालक महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. धरणगाव तालुक्यातील पिंप्री परीसरात निष्काम कर्मयोग्याचे कर्तव्य पार पाडणारा बंडू उर्फ समाधान पुंडलिक पाटील या ॲम्बुलन्स चालकाच्या चांगुलपणाच्या चर्चा परिसरात आहेत. बंधूच्या कर्तव्यपरायण कर्तृत्वाची दखल घेऊन भारत मुक्ती मोर्चा कडून त्याला सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांच्या आरोग्य समस्यांवर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाणे सुलभ व सोयीचे व्हावे या हेतूने जि.प. सदस्य गोकुळ चौधरी यांनी पिंपरी परिसरासाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली आहे. या ॲम्बुलन्सवर चालक म्हणूून काम करणाऱ्या बंडू उर्फफ समाधान पुंडलिक पाटील याने रुग्ण सेवेत स्वतःला समर्पित केले आहे. सध्या कोरोनाच्या सावटाखाली प्रत्येक नागरिक भितीत जगत आहे. अशा भयावह परिस्थिती रुग्णांची  नेे-आण करणे ॲम्बुलन्स चालकांसाठी धोक्याचे आहे. याची जाणीव असतानाही कर्तव्याला समर्पित झालेल्या बंधू उर्फ समाधान पाटील याच्या निष्काम सेवे समोर नतमस्तक व्हावे लागते.

रात्री-बेरात्री एखाद्या गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा फोन आल्यानंतर कोणतेही आढेवेढे न घेता तत्परतेने रुग्णाला ॲम्बुलन्स मधून दवाखान्यात पोहोचविण्याचे काम अखंडपणे बंडू निभावत आहे. बऱ्याचदा ॲम्बुलन्स साठी व त्यांच्या नातेवाईकांकडे डिझेल भरणे एवढे पैसे नसतात. अशा परिस्थितीतही घरची गरिबी असतानाही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कोणतीही झड पोहोचू न देता निष्काम सेवेतून बंडूने खरा आरोग्यदूत  असल्याचे सिद्ध केले आहे.

बंडू उर्फ समाधान पाटील हा सध्या धरणगाव येथील कोविड सेंटर मध्ये ॲम्बुलन्स सेवा पुरवीत आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी प्रथमेश मोहोळ यांचा फोन येताच कोरोनाच्या महामारीतही तातडीने ॲम्बुलन्स घेऊन रुग्णांची ने -आण करणाऱ्या बंडू उर्फ समाधान पाटील यांच्या निष्काम सेवेचा भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे यांनी सत्कार व सन्मान करण्याचे जाहीर केले आहे.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *