१५ ते २१ जुलै पर्यंत सात दिवस पुसद शहरात कडकडीत शट डाऊन

विदर्भ
  • अत्यावश्यक सेवा वगळता भाजीपाला व किराणा दुकाने बंद राहणार
  • लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटनांशी चर्चा करून प्रशासनाचा कठोर निर्णय

 पुसद |राजेश ढोले, दिनांक १३ जुलै

पुसद शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असले तरी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सूचनांना नागरीक गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. शहर व परिसरात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व तालुका प्रशासनाने  पुसद शहर व आजूबाजूच्या परिसरात १५ जुलैपासून ते २१ जुलै पर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुसद शहर, तसेच परिसरातील शेंबाळ पिंपरी, जाम बाजार, बेलोरा व छोट्या बाजार पेठ आदी सर्व ठिकाणी कडकडीत शटडाऊन पाळण्यात येणार आहे. बंद मधून मेडिकल्स, दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून भाजीपाला व किराणा दुकाने पूर्णपणे बंद राहतील.

१५ ते २१ जुलै या सात दिवसांच्या बंद काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गल्ली मोहल्ल्यात गर्दी करून जमा होऊ नये, जे लोक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.  पुसद नगरपालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी कोरोना योद्ध्यांची  जबाबदारी स्वीकारली असून शहर व परिसर बंद करण्यासाठी ते प्रशासनास मदत करणार आहेत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *