राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा-बिरसा क्रांती दलाची मागणी

विदर्भ


यवतमाळ |राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)  दिनांक १३ जुलै

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘ राजगृह ‘ निवास्थानामधील आवारात तोडफोड करुन हल्ला करण्या-या समाजकंटकांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, ग्रुहमंत्री, पोलीस महासंचालक यांना संघटनेने  ई – मेल द्वारे निवेदन पाठविले आहे.

निवेदनाच्या सुरुवातीलाच राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
निवेदनात पुढे म्हटले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘ राजगृह ‘ आवारात अज्ञात समाजकंटकांनी ७ जुलै रोजी तोडफोड केली . राज्यालाच नव्हे तर देशाला काळीमा फासणाऱी ही घटना आहे .
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी बांधले होते.जगभरातील अनुयायी येथे दररोज भेट देतात. जगभरातील अनुयायांसाठी ते अस्मितेचे स्थान आहे.
राजगृहावर हल्ला होणे म्हणजे देशाच्या अस्मितेवर, संविधानावर , झालेला हल्ला आहे. तो कदापिही सहन केला जाणार नाही .

या घटनेमागे निश्चितपणे कोणीतरी असू शकतात.अशा मास्टर माईंडचा शोध घेण्यात यावा .
या मास्टर माईंडसह राजगृहावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करुन जेरबंद करावे.आणि कठोर शिक्षा द्यावी.अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी, महासचिव प्रमोद घोडाम, जिल्हाध्यक्ष प्रा.कैलास बोके, जिल्हा महासचिव प्रफुल कोवे यांनी केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *