जळगावसह अमळनेर व भुसावळ शहरांचा लाॅक डाऊन संपला..!

जळगाव
  • उद्यापासून अनलाॅकची प्रक्रिया सुरू

  •  ६ जुलै पूर्वीचे चे नियम लागू राहणार    जळगाव, दिनांक १३ जुलै

जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जळगावसह अमळनेर व भुसावळ या शहरात लागू करण्यात आलेला सात दिवसांच्या लाॅक डॉऊनला मुदतवाढ देणार नसल्याची घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली आहे. आज या शहरांमधील सक्तीच्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असल्याने पुन्हा लाॅक डाऊनला मुदतवाढ मिळेल का.., अशा चर्चा रंगल्या होत्या.मात्र जिल्हाधिकारी यांनी लाॅक डाउनला मुदतवाढ देणार नसल्याची घोषणा केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला  असून  उद्यापासून शासकीय नियमानुसार जळगाव अमळनेर भुसावळ शहरात अनलॉकची अंमलबजावणी केली जाणार आहे.

केंद्र सरकारने देशभरात अनलॉक अंतर्गत मिशन बिगेनची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार उद्यापासून जळगाव अमळनेर भुसावळ शहरातही व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात होणार आहे. या तीन शहरांमध्ये सक्तीचा सात दिवसांचा लाॅक डाऊन घोषित होण्यापूर्वीचे नियम उद्या दिनांक १४ जुलै पासून लागू राहतील.यापुढे ६ जुलैपर्यंत जे नियम लागू होते, तेच नियम यापुढेही कायम राहणार आहे.
जळगाव, अमळनेर व भुसावळ हे तीन शहर कोरोना हॉटस्पॉट ठरले होते. या शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जुलैपासून ते १३ जुलैपर्यंत सात दिवसांचा कडक लाॅक डाऊन घोषित केला होता.या शहरातील जनतेनेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे तीनही शहर पूर्णपणे बंद ठेवले. किरकोळ अपवाद वगळता या शहरांमध्ये वाहतूकही या काळात पूर्णपणे बंद झाल्याने सर्व रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र होते. किराणा दुकाने व भाजीपाला विक्री बंद असल्याने रस्त्यावर दिसू लागलेली गर्दी दिसेनाशी झाली होती.
‌‌ जळगाव अमळनेर व भुसावळ शहरांमध्ये  लागू करण्यात आलेला लाॅक डाऊन यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त तैनात केल्याने या शहरातील लाॅक डाऊन यशस्वी झाला असे म्हणता येईल.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव, अमळनेर व भुसावळ शहरामध्ये लागू करण्यात आलेला सात दिवसांच्या लाॅक डाऊनमुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प पडले होते. या शहरातील आर्थिक गतीही मंदावलेली असून उद्यापासून शहर पूर्वपदावर येणार असल्याने थोड्याफार प्रमाणावर बेरोजगार झालेल्यांचा रोजगारही सुरु होण्यास मदत मिळणार आहे.
दरम्यान, जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुले उघडे ठेवण्यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *