संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांची आज बैठक
मुंबई, दिनांक २१ जुलै
दूध दरवाढीसाठी राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले असून त्याचे तीव्र पडसाद उमटत आहे. मागील तीन वर्षापासून दूध दरवाढीसाठी आंदोलन करून पाठपुरावा करणाऱ्या शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचे आज दुपारी बैठक होणार आहे.
दरम्यान, गाईचे दूध २७ रुपये असताना शासन प्रशासनातील कसायांनी दुधाचा भाव परस्पर २५ रुपये लिटर केला. यामुळे मागील एक वर्षात चार महिन्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची ८७०० कोटींची लूट झालेली आहे. ही लूट परत करा अन्यथा तुरुंगात जायची तयारी ठेवा असा इशारा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार राजे यांनी दिला आहे. दूध दर फरकातील ४६०० कोटी रुपये कोणाला दिले, त्याचा बँक अहवाल द्या,अन्यथा न्यायालयीन लढाईला तयार राहा असे संघटनेने सांगितले आहे.
शेतकऱ्यांच्या दूध प्रश्न बाबत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार राजे यांनी दिली.
वेडे होऊन बारामतीला व वि पक्षांकडे जायला निघालेले अनेक बुजगावणे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करीत असल्याचा आरोप संघटनेच्या संघटन सचिव डॉ.सुलभा सूर्यवंशी यांनी केला आहे. संघटनेचे मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार राजे व दादाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघटनेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. संघटनेचे कायदेशीर सल्लागार अजय तल्हार समर्थपणे कायदेशीर बाजू सांभाळत असल्याने तीन चाकी सरकार आजुन गेल्याची प्रतिक्रिया शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या सहसचिव मालती पाटील व चेतना ढमढेरे यांनी व्यक्त केली.
जाणते नेत्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांची झालेली ८७०० कोटी रुपयांची लुट लपविण्यासाठी गहाण नेते उभे केल्याचे मत संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवक्ते भारत जाधव यांनी व्यक्त केले.
दूध उत्पादक शेतकर्यांच्या न्यायासाठी संघटनेकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल, प्रमोद रंगारी, प्रदेश सहसचिव मालती प्रकाश पाटील, विदर्भ विभागाचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र पाटील, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते भारत जाधव, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा चेतना ढमढेरे, पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीचे अध्यक्ष हिरामण बांदल आदी उपस्थित होते.
The rise of Citizen Mirror as India’s leading online news channel within a short span of its existence owes a lot to the vision of its chairman and editor-in-chief Bharat Sasane and the dedication and toil of its ever-growing team of Citizen Mirror professionals.
जबरदस्त जोरका झटका धिरेसे, थँक्स मिरर.