माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील आरोपी नलिनीने केला तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न

राष्ट्रीय


सिटीजन मिरर वार्ता | दिनांक २१ जुलै

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनीने काल रात्री वेल्लोर तुरूंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. अशी माहिती नलिनी यांचे वकील पुगलेन्ती यांनी दिली आहे.”


असे सांगण्यात येत आहे की, तुरुंगात नलिनीचे एका महिलेसोबत भांडण झाले होते. यासंदर्भात माहिती देताना नलिनीची वकील पुगलेन्ती यांनी सांगितले की, गेली २९ वर्ष तुरुंगात असलेल्या नलीनीने यापूर्वी असा कधीही प्रयत्न केला नव्हता. यामुळे नलिनीच्या आत्महत्या करण्याच्या केलेल्या प्रयत्नाची खरी वस्तुस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पुगलेन्ती यांनी माहिती देताना सांगितले, नलिनीशी भांडण करणारी महिलादेखील तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. भांडणाची तक्रार जेलरकडे कैदी महिलेने केल्यानंतर नलिनीने काल रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला.

नलिनीचा पती मुरुगण हा सुद्धा राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी तुरूंगात आहे. नलिनीला वेल्लोर तुरुंगातून पुझल तुरुंगात शिफ्ट करण्यात यावे अशी मागणी मुरुगन यांनी केली आहे. नलिनी चे वकील  पुगलेन्ती म्हणाले, मुरगन ची मागणीीी न्यायालयात मांडली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *