वाघजाळी जवळील शेतशिवारात वरळी मटक्यावर पोलिसांची धाड

विदर्भ

खंडाळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्तपुसद |राजेश ढोले, दिनांक २१ जुलै

वाघजाळी ग्रामपंचायती कडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरील मांजर जवळा फाटा जवळ एका शेत शिवारात सुरू असलेला वरळी मटक्यावर खंडाळा पोलिसांनी धाड टाकून पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, मांजर जवळा फाटा जवळ एका शेतशिवारात वरळी मटक्याचे आकडे घेतले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खंडाळा पोलीस ठाण्याचे पो. कॉ. संदीप चव्हाण यांनी पोलिस पथकासोबत मांजरा जवळा फाट्यावरून वाघळी गावाकडील परिसरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रस्त्यावर वाहन उभे करून छुप्या पद्धतीने पायदळ जात शेत शिवारात सुरू असलेल्या वरळी मटक्यावर अचानक धाड टाकली.

खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी मटका जुगार खेळणाऱ्या अंकुश उत्तम राठोड (वय २४) रा. रामपूर नगर ( सावरगाव गोरे), मधुकर निवृत्‍ती खडसे (वय ६०) रा. बेलोरा, देवराव रामजी शिंदे (वय ४५ ) रा.बेलोरा, अंबादास किसन दळवे (वय ४५) रा. बेलोरा, सिद्धार्थ निवृत्ती मुळे (वय ६२)रा. बेलोरा या पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून वरळी मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यासह विश्वनाथ शिरडे  रा.कन्हेरवाडी, सुभाष रामचंद्र दळवी  रा. कन्हेरवाडी, भाऊराव प्रकाश राठोड रा. वाघजाळी, अंकुश आडे यांची अंगझडती घेतली असता  त्यांच्याकडून वरळी मटक्याचे चिठ्या व मिलन डेे लिहिलेल्या चिठ्ठ्या आढळून आल्या.त्यांच्याकडून ३ हजार ४५० रुपये व साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय  त्यांच्याकडून ४३ रुपये किमतीची  मोटरसायकल    जप्त करण्यात आली आहे.

मधुकर निवृत्ती खडसे यांच्या अंगझडतीत दोनशे रुपये सह मोबाईल असे बाराशे रुपयांचा मुद्देमाल, देवराव रामजी शिंदे यांच्याकडून १६० रुपये नगदी मोबाईल्स १ हजार १६० रुपये, अंबादास दळवी यांच्या झडती मध्ये १८०रुपये नगदी मोबाईल सह १ हजार ८८० रुपये,  सिद्धार्थ मुळेकडून २६० रुपये सह १ हजार २६० रुपये किमतीचा मोबाईल, सुभाष रामचंद्र दळवी यांच्या कडून १८० रुपये व एक हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १ हजार १८० रु. मुद्देमाल जप्त केला आहे. प्रकाश राठोड १७० रुपये नगदी मोबाईलसह इतर साहित्य चार हजार ७५० रुपये, तीस हजार रुपये किमतीची एक मोटर सायकल  जप्त करण्यात आली आहे.

या धाडीत ४९ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *