योगी सरकारच्या उत्तर प्रदेश मध्ये दलित परिवाराला अंत्यसंस्कारास मनाई…!

राष्ट्रीय

अर्ध्यातच चिता विझवून बाहेर काढलं शव



सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २२ जुलै

योगी सरकारच्या उत्तर प्रदेश मध्ये दलित आदिवासी अल्पसंख्याक समुदायावर मोठ्या प्रमाणात त्याच्या होत असल्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सचिन माणुसकीला काळिमा फासणारी घटना आग्रा जवळच अछनेरा परिसरातील रायभा येथे घडली आहे.नाट समाजातील महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनी तिचे अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीत केले. मृतदेहाला अग्नी देण्याची तयारी सुरू असतानाच गावातील काही लोकांनी स्मशानभूमीत येऊन मनाई केल्याने महिलेचे अर्धवट जळालेले शिव बाहेर काढून अन्य ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे याप्रकाराची माहिती मिळताच पोलिस स्मशानभूमीत पोहोचले. मात्र, त्यानंतरही महिलेवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करु देण्यात आले नाही.

दलित समाजात पैकी नाट जातीतील २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर आग्रा गावाच्या जवळच असलेल्या परिसरातील रायबा येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत असतानाच थोड्या वेळात ठाकूर समाजातील काही लोक आले आणि त्यांनी निषेध करण्यास सुरवात केली. अखेर, त्या महिलेच्या मृतदेहावर दुसरीकडे अंत्यसंस्कार करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाला अग्नी देण्यात येणार होता. मात्र या विरोधामुळे चिता विझवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हाययरल झाला आहे.

या वादानंतर अछनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा गोंधळ थांबवला, मात्र आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या परिस्थितीत तहसील किरावली गावात नाट समाजातील महिलेचा मृतदेह काढून अन्य ठिकाणी अंतिम संस्कार करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे उच्च समाजातील स्मशानभूमीवर मृतदेह जाळण्याच्या वादात पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच, पीडित कुटुंबाला कोणतीही मदत केली नाही, असे आरोप करण्यात येत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *