अमोल भालेराव यांना सेवक सेवाभावी संस्थेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहिर

विदर्भ


  पुसद| राजेश ढोले, दिनांक २४ जुलै

 

पुसद शहराचे भूमिपुत्र अमोल पंचफुला निवृत्ती भालेराव यांना जळगाव येथील सेवाभावी संस्थेने नुकताच महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहिर केला आहे.पुसद तालुक्यातील कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनच्या काळात  त्यांनी  सेवा कार्य करून गरीब व गरजु कुंटुबाची  मदत केली आहे.

अमोल भालेराव यांना आतापर्यंंत राजस्थान राज्यातिल प्रतिष्ठेचा नारायण सामाजिक पुरस्कार, कर्णधार अवार्ड,राष्ट्रव्यापी अभियान कडून वर्ल्ड सोशल आयकॉन अवार्ड,पंचवटी ब.सेवाभावी संस्थेकडून आदर्श भारत पुरस्कार,ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड कडून ओएमजी इनस्पिरियशन इंडियन सन्मान,बाल युवा नारी मंच कडून प्रतिभा सन्मान,कॉसमॉस वर्ल्ड रिकॉर्ड कडून सन्मानपत्र,शील्ड शेकुर सर्विस कडून विशिष्ट सेवा सन्मान,श्रीराम सोसायटी कडून कोरोना फाइटर आयकॉन अवार्ड, डायनामिक वर्ल्ड नेपाळ कडून सन्मानपत्र, शक्ति फ़िल्म प्रॉडक्शन कडून शक्ति योद्धा सन्मान,नारी फांउडेशन कडून विभा मुनि योगारत्न अवार्ड,इत्यादि पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

सेवक सेवाभावी संस्था, जळगावचे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी नुकताच त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराची जाहीर केला आहे.

अमोल भालेराव यांनी अनेक सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्षपद भूषवले आहे.समाजावारिल अन्याय आत्याच्याराविरुद्ध,विद्यार्थ्याचे प्रश्न,युवा बेरोजगार यांच्यासमस्या,आत्महत्याग्रस्तशेतकरी,बालमजुरी, पर्यावरणअश्या अनेक सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो.

महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल कुंटुब,मित्रपरिवार,सहकारी,समाजिक कार्यकर्ते,सामाजिक संघटना,राजकीय पक्ष,प्रशासकीय सेवक इत्यादिनी त्यांच्यावर अभिनदंनाचा वर्षाव केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *