मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण

राष्ट्रीय


•कोरोना संसर्गाची बाधा झाल्याची मुख्यमंत्री  चौहान यांनी स्वतः दिल्ली्ली सोशल मीडियावर माहिती


सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २५ जुलै

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियातून दिली आहे.“माझ्या प्रिय प्रदेशवासियांनो, मला कोविड-१९ ची लक्षणे होती, त्यामुळे चाचणी केली असता, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे”, असं शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करुन सांगितले आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करुन आपल्या प्रकृतीची माहिती दिली. “कोरोनाबाबत ज्या मार्गदर्शिका आहेत, त्या सर्वांचं पालन करत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला क्वारंटाईन करुन घेईन. माझं मध्य प्रदेशच्या जनतेला आवाहन आहे की, प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. थोडासाही निष्काळजीपणा कोरोनाला निमंत्रण देतो. मी कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र अनेक लोक कामानिमित्त भेटायला येत होते”, असं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.