कोरोना बाधितांचा मृत्यू रोखण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करा-जिल्हाधिकारी एम.डी. सिंह

विदर्भ


  • संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, नमुन्यांची चाचणी, सारी व आयएलआयच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

यवतमाळ| राजेश ढोले, (जिल्हा प्रतिनिधी)

दिनां २६ जुलै

यवतमाळ जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी नियोजन भवनात बैठक बोलावली होती.

बैठकीस जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पीएस. चव्हाण यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी बैठकीला संबोधित करताना जिल्हाधिकारीएम.डी. सिंह म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. गुरुनाथ संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्यू थांबविणे याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, जास्तीत-जास्त नमुन्यांची चाचणी करणे, सारी व आयएलआयच्या लक्षणांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सर्वांनी अतिशय गांभीर्यपूर्वक काम करावे.


               “आयएलआय व सारीचे लक्षणे आढळणारे व्यक्ती अतिशय गंभीर अवस्थेत  वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होत असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी कमी वेळ मिळतो. पर्यायाने मृत्यू होण्याची शक्यता वाढते. पूर्व व्याधींनी ग्रस्त असलेल्या नागरिकांची यादी शहरी व ग्रामीण भागात अपडेट असायला हवी.”                                     – जिल्हाधिकारी एम.डी.सिंह


मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून पहिल्या अडीच महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात एकाही रुग्णांची नोंद नव्हती.मात्र, सद्यस्थितीत कोरणा संसर्ग झालेल्यांचा आकडा वाढत आहे. यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला भाग त्वरित प्रतिबंधित करून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, नमुन्यांची चाचणी वाढविणे याला प्राधान्य दिले जात आहे. यात एक टक्काजरी लोक सुटले तर कोरोना साखळी वाढण्याची शक्यता आहे. अशीही बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

       २५ हजार अॅटीजन किट साठी दोन कोटी रुपये मंजूर

     जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांची कोरोना नमुना चाचणी तपासण्यासाठी २५ हजार अॅटीजन किट खरेदी करण्यात येणार असून पालकमंत्री संजय राठोड यांच्या सूचनेवरून दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *