लाॅकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर उतरून विरोध करु- बाळासाहेब आंबेडकर

राज्य


• लॉकडाऊनच्या मानसिक त्रासाची जाणीव लोकांना झाली आहे. त्यामुळे ३१ जुलैनंतर लॉकडाऊन वाढला, तर वंचित बहुजन आघाडी शासनाच्या विरोधात जाईल.– शासनाला दिला इशारा


अकोला, दिनांक २७ जुलै

        “ दानदात्यांची क्षमता संपलेली आहे.आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. लोकांची सहनशीलताा आता संपली आहे. त्यामुळे ३१ जुलै नंतर लाॅक डाऊन वाढवल्यास रस्त्यावर उतरून विरोध करु.सरकारने भीती दाखवू नये.माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी आहे.”असे रोखठोक मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष   अॅड. बाळासाहेब  आंबेडकर यांनी  अकोला येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.“मी स्वतः कोविडची टेस्ट करुन घेतली आहे. राज्य सरकारने आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व लोक प्रतिनिधींची कोविड टेस्ट करुन घ्यावी. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, त्यांना शासनाने क्वारंटाईन करावं. मात्र, ज्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे त्यांना फिरायला रानमोकळ करावं,” असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. सरकार तिजोरीत पैसा नाही म्हणतं, मग टेंडर  काढून कॉन्ट्रॅक्टरचे पैसे कसे देण्यात येतात? असा प्रश्न त्यांनी विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *