मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोलाणी मार्केटमध्ये आरोग्य तपासणी संपन्न

जळगाव


• गोलानी मार्केट सिंधी संंगतने केले होते आयोजन

• गोलानी मार्केटमध्ये साचलेला केर कचऱ्याची साफसफाई


जळगाव, दिनांक २८ जुलै

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोलानी मार्केट येथे व्यापारी व ग्राहकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन गेल्या चार महिन्यापासून मार्केटमध्ये साचलेल्या केरळ कचऱ्याची साफसफाई करण्यात आली. गोलाणी मार्केट सिंधी संगत, मोबाईल विक्रेते व व्यापारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० या होमिओ यादी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.


शिवसेनेचे जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी उपमहानगरप्रमुख मानसिंग सोनवणे, व्यापारी संघटना अध्यक्ष पुनम राजपूत, गोलाणी ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ मार्केट सिंधी संगतचे अध्यक्ष जवाहर लालवाणी, सचिव महेश चावला, दीपक कुकरेजा, जसपाल पासवानी, विजय बोरोले, गिरधर डाबी, पिंटू लुल्ला, गीतू मंधाण, सागर कुकरेजा, मनोज खानचंदानी, मोहित माधवानी, कृपाल, राहुल आदी उपस्थित होते.

आरोग्य शिबिरासाठी कृती फाउंडेशन, माधव बाग तर्फे डॉ. श्रद्धा माळी, डॉ. श्रेयश महाजन, घनश्याम महाजन यांनी कोरोनाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी गुरुप्रसाद पाटील यांचे अनमोल सहकार्य मिळाले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *