कुत्रीवर बलात्कार ; ४० वर्षीय विकृत व्यक्तिविरुद्ध ठाणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा

क्राइम
छायाचित्र-प्रतिकात्मक

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २९ जुलै

अलीकडच्या काही महिन्यात  समाजात  विकृत बळावत चालल्याच्या अनेक लाजीरवाण्या तितक्याच संतापजनक घटना घडत आहेत. महिलांच्या छेडछाड, विनयभंग व बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.पण, आता नराधमांनी मुक्या प्राण्यांना आपल्या वासनेचा शिकार बनवल्याच्या निंदनीय घटना सुद्धा घडू लागल्या आहेत.पंधरा वीस दिवसांपूर्वी चार वर्षे वयाच्या पाळीव कुत्रीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथे घडली होती. या प्रकरणात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात होता.ही घटना ताजी असताना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक प्रकरण समोर आले आहे, जेथे एका ४० वर्षीय व्यक्तीवर कुत्रीच्या बलात्काराचा आरोप आहे. श्रीनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून, त्याची  चौकशी केली जात आहे.

या लाजिरवाण्या व संतापजनक घटनेची मिळालेली महिती अशी की,रस्त्यावर कुत्र्यांना खायला देणाऱ्या काही मुलांना हा आरोपी विकृत कृत्य करत असल्याचे आढळले होते. त्यांनी या गोष्टीची माहिती अदिती नायर यांना दिली व पुढे त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ठाणे येथील वागळे इस्टेटच्या फूट ओव्हर ब्रिजवर ही घटना घडली. आरोपीवर आयपीसी कलम ३७७ आणि क्रूरता अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली. मात्र, आरोपी शनिवारपासून या गोष्टीचे नियोजन करत होता. सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपीने यापूर्वीही प्राण्यांबरोबर असे कृत्य केले असावे, त्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्याचीही तपासणी केली जाणार आहे.

या घटनेत विकृत पुरुषाकडून वासनेचा शिकार झालेल्या  कुत्रीचा शोध घेण्यात येत आहे. तिची वैद्यकीय तपासणी केली जाईल. वैद्यकीय अहवालात बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीस शिक्षा होऊ शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *