संचारबंदीच्या काळात तिन्ही आमदारांनी पुसद मधील गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची वाटप करा

विदर्भ

• गरीब, श्रमजीवी, वंचित मजुरांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करा


– एआयएमआय पक्षाची मागणी*संचार बंदी मध्ये तिन्ही आमदारांनी पुसद मधील गरीब गरजू जनतेला जीवनावश्यक वस्तू वाटप करा*

*AIMIM एम,पुसद ची मागणी.*

*गरीब श्रमकरी वंचित मजूर दाराच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करा*

पुसद प्रतिनिधी राजेश ढोले

दिनांक: 27 जुलै,पुसद

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावला कमी करण्याच्या उद्देशाने पुसद मधील तिन्ही आमदार इंद्रिनिल नाईक, डॉ. वजाहत मिर्झा, अॅड.निलय नाईक यांनी यवतमाळ च्या जिल्हाधिकारी यांना विंनती करून संचारबंदी करण्यास भाग पाडले. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत जनतेला सहभागी न करता राजकिय आणि प्रशाकासकीय लोकांद्वारे संचार बंदी दिनांक २१ जुलै ते २८ जुलै पर्यंत करण्यात आली होती.याचे पुसद येथील गरीब जनतेने खूप काटेकोरपणे पालन केले. परंतु  संचारबंदीला पुन्हा २८ जुलै पासून ३१ जुलै २०२० पर्यंत जनतेच्या समस्यांना न पाहता ही संचार बंदीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे पुसद येथील गोर गरीब जनतेवर उपासमारीची पाळी आली असून खाण्या पिण्याचे हाल होत आहे. परंतु आमदार  शहरातील काही श्रीमंत मंडळीचा विचार करीत आहे.ज्या लोकांचे जीवन पोट हातावर घेऊन जगतात ,रोजमजुरी करून कुटुंबाच उदरनिर्वाह करतात त्या सर्व पुसद मधील गरीब जनतेला  तिन्ही आमदारांनी रेशन किट वाटप करावे अशी मागणी पुसद शहर एआयएमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी पुसदचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे  केली आहे.

पुसद येथील आमदार अॅड.इंद्रनील नाईक, डॉ. वजाहत मिर्झा,अॅड.निलेय नाईक यांनी  एआयएमआयएमच्या मागणीची दखल घेऊन पुसद येथील गरीब जनतेला तात्काळ जीवनावश्यक वस्तू रेशन किटच्या स्वरूपात वाटून दिलासा द्यावा. हीच मांगणी सर्व गरीब जनतेकडून देखील होत आहे.

निवेदन देतांना एमआयएमचे शहराध्यक्ष सय्यद सिद्दीकोद्दीन, व मोहमद जिब्रण व मजलिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *