महात्मा मुंगसाजी आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा, मरसुळचा दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९८.९१टक्के निकाल

विदर्भ

पुसद| राजेश ढोले, दिनांक ३० जुलै

महात्मा मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचालित महात्मा मुंगसाजी आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा,मरसुळचा दहावी बोर्ड परीक्षेचा  निकाल ९८.९१ टक्के एवढा लागलेला आहे.

या शाळेतून एकूण ९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. प्राविण्य प्राप्त विद्यार्थी ५२ आहेत. प्रथम श्रेणी मध्ये ३१ विद्यार्थी आले असून द्वितीय श्रेणीत  ८ विद्यार्थी आले आहेत.

माध्यमिक आश्रमशाळेच्या वस्तीगृहातील ऋषिकेश कैलास गरीबे हा विद्यार्थी ८६.८० टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम आला आहे.

तर मुली मधून कुमारी मंजुषा पांडूरंग आगोसे या विद्यार्थिनीने ८४.४० टक्के गुण प्राप्त करून शाळेतून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे .

या विद्यार्थ्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. परीक्षेत वस्तीगृहातील आदिवासी निवासी मुलामुलींचे प्रमाण १०० टक्के आहे. ग्रामीण दुर्गम आदिवासी भागातील या आश्रम शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

आश्रमशाळेने मिळवलेल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए.जी.सय्यद, संस्थेचे आधारस्तंभ अॅड. शिवाजीराव मोघे (माजी मंत्री महाराष्ट्र), राज्य एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी,संस्थेचे अध्यक्ष श्री. मारोतराव वंजारे, शाळेचे संचालक लीलाधर मळघणे व सर्व कर्मचारी यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *