उद्यापासून राज्यभरात तीव्र दूध दर आंदोलन

राज्य

• कायदे पाळा..,नाही तर चालते व्हा-शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचा शासनाला इशारा


पुणे, दिनांक ३१ जुलै

दूधासह कापूस, मका, ऊस, चना शेत मला राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याने शरद जोशी विचारमंच संघटनेकडून राज्य शासनाला ­­’कायदे पाळा अन्यथा चालते व्हा’ असा इशारा देऊन  उद्या शनिवार दिनांक १ जुलैपासून दूध दर आंदोलन केले जाणार आहे.

दूध विकास मंत्री सुनील केदार व शासनाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्क व अधिकारांसाठी वेळोवेळी निवेदन दिली आहेत. मात्र शासनाकडूनच कायदे पाळले जात नसल्याने शरद जोशी विचार मंच संघटनेने प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार राजे त्यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राज्यभरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात निर्णायक आंदोलन छेडण्याची तयारी चालवली असून उद्या दिनांक१ जुलै पासून तीव्र दूध दर आंदोलन करण्यात येणार आहे. दूध  दरातील लुटमारीचा दगडांना दुधाने आंघोळ घालुन, दुधदर लुटीत सरकारच्या  सहभागाचा आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेच्यावतीने जाहीर निषेध केला जाणार आहे.

संघटनेच्या मागण्या:-

१) दुध दर हमी भावाचे पालन करा, व २०१७ पासूनचे दुध दर लुटीचे हिशोब द्या.

२) गेल्या १४ महिन्यातत दोन रुपयचे ( २७/- ते २५/ -) फरकातील रुपये ७ हजार ९०० कोटींची दुध दर फरकातील लुट वापसी व्याजासह परत करा.

३) दुध वजनमापे, फँट, एस. एन. एफ. तपासणी कंप्लसरी करा, शेतकरी सहभागासह तपासणी पथके नेमा.

४) दुध दर मोजमाप पावत्या दर दिवशी द्या, हे रेकाँर्ड चेक करणारे शेतकरी सहभागासह, भरारी पथक नेमा.
५) हमी भावा पेक्षा कमीने पत्रक काढून, दुध घेणाऱ्या खाजगी, सहकारी दुध संस्थांवर, शेतकरी फसवणुक, दुध दर चोरी आयपीसी अक्ट कलम ३९५,४२०,३४ व चोरी ३७८,खोटेपणा ४१५, पुरावे नष्ट करणे २०१, कायद्याचे उल्लंघन करणे, आदी सुधारीत कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत.
शरद जोशी विचार मंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार राजे, उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल, प्रमोद रंगारी, प्रवक्तेे भारत जाधव यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहे अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *