महापालिका प्रशासनाचा एकच बेस.. पुन्हा एकदा वॉटर ग्रेस..!

जळगाव

• आजपासून पुन्हा वॉटर ग्रेस करणार जळगाव शहराची साफसफाई ; महापौरांचा विरोध असूनही महापालिका प्रशासनाने दिली संधी 


• कोविड सेंटरच्या साफसफाई कामाबाबत मात्र प्रशासनाची  संशयास्पद चालढकल ; निविदा उघडूनसुद्धा मंजुरी आदेश नाहीत


जळगाव, दिनांक ३१ जुलै

“ जळगाव शहराच्या दैनंदिन साफसफाईच्या कामासाठी महापालिका प्रशासनाने आज सायंकाळी तातडीने निर्णय घेत बहुुचर्चित वॉटर ग्रेेेेेेेेस कंपनीला पुन्हा एकदा संधी देण्याच्या निर्णयावर महापौरांच्या विरोधानंतरही शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे उद्या शनिवार दिनांक १ ऑगस्ट पासून वॉटर ग्रेस कडून जळगाव शहराच्या साफसफाईला सुरुवात होणार आहे. मात्र, कोविड सेंटरसाठी आलेल्या सुरक्षा व सफाई कामाच्या निविदा शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता उघडण्यात येऊनही  कोणालाच मंजुरी आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे कोविडच्या कामापेक्षा वॉटर ग्रेसला पुन्हा संधी देण्याची  महापालिका प्रशासनाची तत्परता संशयास्पद आहे.”


           गेल्यावर्षी जून २०१९ मध्ये जळगाव शहराच्या दैनंदिन स्वच्छता व साफसफाईचा कंत्राट तब्बल ७५ कोटीमध्ये वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आला होता. मात्र  जळगाव शहरातील साफसफाईची समस्या कायम राहिल्याने वॉटर ग्रेसच्या कामकाजाबद्दल सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांसह नागरिकांचाही विरोध होत असल्याने तेरा  सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांसह फेब्रुवारी महिन्यापासून वॉटर ग्रेसचे काम थांबविण्यात आले होते. मात्र, वॉटर ग्रेसकडून शहराच्या साफसफाईचे काम थांबविण्यात आल्याने महापालिकेला कायदेशीर अडचणी येऊ शकतात असे कारण समोर करून वॉटर ग्रेसला पुन्हा साफसफाई कामाची संधी देण्यासाठी आयुक्तांनी  ­“पुुुुढाकार” घेतला. विशेष म्हणजे ­“जे शहराचे हित पाहणार नाहीत, त्यांना कायम विरोध असेल” अशी स्पष्ट भूमिका घेऊन महापौर भारतीताई सोनवणे यांनी वॉटर ग्रेसला प्रखर विरोध केला आहे. असे असताना सामंजस्याने मार्ग न काढता वॉटर ग्रेसला पुन्हा संधी न दिल्यास कायदेशीर अडचणीचा बागुलबुवा उभा करून मनपा प्रशासनाने शुक्रवारी संध्याकाळी तातडीने वॉटर ग्रेस का जळगाव शहराची साफसफाई करण्यास हिरवा कंदील दिला.   

    ­“  वाॅटर ग्रेसला जळगाव शहराच्या साफसफाईचे काम पुन्हा देण्याच्या महापालिका आयुक्तांच्या भुमिकेचे समर्थ करता येणार नाही. वॉटर ग्रेसच्या कामकाजाबद्दल नागरिकांची प्रचंड नाराजी असल्याने त्यांच्याकडून फेब्रुवारीमध्ये काम काढून घेण्यात आले होते. या कंपनीवर दंडात्मक कारवाई देखील महापालिकेने केली होती. वॉटर ग्रेस कंपनीला ज्या अटी आणि शर्ती वर साफसफईसाठी ठेका दिला होता,त्याचे उल्लंघन झाल्याने त्यांच्याकडून काम काढून घेण्यात आले होते.आता मनपा आयुक्तांनी कायदेशीर अडचणी येऊ नयेत असे कारण समोर करून वॉटर ग्रेस ला पुन्हा संधी दिली आहे.यामुळे नेमक्या कोणत्या कायदेशीर अडचणी आहेत याचा खुलासा आयुक्तांनी केला पाहिजे.वॉटर ग्रेस ला पुन्हा ठेका देताना कुठे तरी पाणी मुरत असून याला आयुक्तच जबाबदार राहतील.”
                    – नगरसेवक नवनाथ दारकुंडे


 

दरम्यान, जळगाव शहरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मनपाच्या कोविड सेंटरची सुरक्षा व साफसफाई करण्यासाठी सुमारे ४५० कामगारांचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेने ११ जुलै रोजी निविदा काढली होती. २२ जुलै पर्यंत केवळ दोनच निविदा प्राप्त झाल्याने २७ जुलै पर्यंत मनपा प्रशासनाने निविदा मुदतवाढ दिली. या कामांसाठी प्राप्त दीपक ऊत्राजी(अमरावती), दिनज्योती बचत गट ( जळगाव), व अाराध्या एंटरप्राजेस (सोलापूर) यांच्या निविदा शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडण्यात आल्या. परंतु, याचवेळी वाटर ग्रेसला पुन्हा काम देण्याच्या घडामोडी सुरू झाल्याने कोविडपेक्षा वाॅटर ग्रेसला प्राधान्य मिळाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *