दूध दर आंदोलन : तीन दगडांना दुग्धाभिषेक करून शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे महाआघाडी सरकार विरोधात अभिनव आंदोलन

राज्य

पुणे, दिनांक १ ऑगस्ट

दूध दरवाढीच्या मागणीसाठी आज राज्यभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पुणे येथे शरद जोशी विचारमंथन शेतकरी संघटनेने प्रतीकात्मक स्वरूपात तीन दगडांना दुग्धाभिषेक करून तीन पक्षांच्या समावेश असलेल्या महाआघाडी सरकारच्या विरोधात केलेल्या अभिनव आंदोलनाने लक्ष वेधून घेतले.

 

गाईचे दूध रू.२७ व म्हशीचे दुध दर रू.३६ व २० टक्के आणि हमीभाव वाढ, भावांतर योजनेतील ४७०० कोटी, तसेच गत १५ महिन्यातील २ रुपये फरकाची ८७०० कोटींपेक्षा अधिक रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांना सव्याज परत मिळावी या मागणीसाठी काय करायचं शरद जोशी विचार मंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार राजे व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ.महानंदा पवार राजे यांनी पुणे येथे संचार बंदीचे पालन करून तिनं दगडांना दुग्धाभिषेक केले. तसेच संघटनेच्यावतीने गायी वासरांना दुग्धाभिषेक करण्यात घेऊन कुत्रे मांजरांना दूध पाजून आंदोलन केले.

संघटनेचे पुणे येथील केशवनगर शाखा क्र.११० याठिकाणी झालेल्या अभिनव आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधण्यात आले. इंदापूर येथील शाखा क्र.२२४ येथे वासरांना व देवांच्या प्रतिमांना अभिषेक करून दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. अशाच प्रकारे शरद जोशी विचार म्हणून तर शेतकरी संघटनेकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार राजे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. महानंदा पवार राजे, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे युवक अध्यक्ष रवी राणा पवार, शेतकरी वाहतूक आघाडी अध्यक्ष रोशन बारदेस्कर, युवा आघाडी उपाध्यक्ष नितीन चौधरी, भारत जाधव, सौरभ भंडारी, राणा सत्यजितसिंह पवार, सदस्य अनिल भांडवलकर, प्रसिद्धीप्रमुख ए. एम. खान, दीपक मुंदडा आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *