थांबता थांबेना कोरोनाचा कहर.. कोरोनाच्या विळख्यात आले जळगाव शहर..!

जळगाव

• जळगाव शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक


      • जिल्ह्यात २८५ रुग्ण आढळले तर जळगाव शहरात आज पुन्हा ७५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह


•  जळगाव जिल्ह्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झाली ११३८८


जळगाव, दिनांक १ ऑगस्ट

जळगाव शहरात चारही बाजूने कोरोना विषाणूने विळखा घातल्याने मागील काही दिवसांपासुन शहरात कोरोना संक्रमित रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज नव्याने जळगाव शहरात ७५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आज २८५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून  कोरोना बाधित रुग्णाची संख्या ११३८८ एवढी झाली आहे.आज २८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले अआहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ७८४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.आज ९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आजपर्यंत ५२७ रुग्णांचा जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात ३०२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जळगाव जिल्ह्यात निवडून आलेल्या कोरोना संक्रमित रुग्णांची तालुका निहाय संख्या पुढीलप्रमाणे:-

जळगाव शहर ७५,जळगाव ग्रामीण १८,
भुसावळ १२, अमळनेर १६,चोपडा २०,  पाचोरा २३,भडगाव ११,धरणगाव २५, यावल ०१,एरंडोल ००,जामनेर ३५,रावेर ०९ ,पारोळा ०६, चाळीसगाव २७ मुक्ताईनगर ०६ बोदवड ००, अन्य जिल्ह्यातील ०१