दहावीच्या बोर्ड परीक्षेत ऋषिकेश चव्हाण विदर्भातून द्वितीय आल्याने बंजारा समाजाच्या शिरावर मानाचा तुरा

विदर्भ

• नागपूरचेे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ऋषिकेश चव्हाणचा हृदयस्पर्शी सत्कार


पुसद | राजेश ढोले, दिनांक २ ऑगस्ट

मार्च २०२० मध्ये झालेल्या, दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९९.४४ टक्के गुण घेऊन विदर्भातून दुसरा  आलेल्या बंजारा समाजातील हृषीकेश राजेश्वर चव्हाण यांच्या बजाज नगर येथील घरी जाऊन नागपूर जिल्ह्याचेे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, नागपूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्य )  शिवलिंग पटवे , तसेच अधिकारी विजय कोहाळे यांनीसुद्धा हृषीकेश चव्हाण  व त्यांच्या पालकांचा पुष्पगुछ तसेच भेटवस्तू देऊन सत्कार केला.

 


हृषीकेशला पुढे एमबीबीएस करून न्यूरोसर्जन व्हायचे असून समाजातील गोर गरीब रुग्णांची सेवा करायची आहे.

त्याचे वडील श्री. राजेश्वर धनलाल चव्हाण हे  कृषी महाविद्यालय नागपूर सहा. रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहेत तर आई सौं. सुरेखाताई चव्हाण ह्या गृहिणी आहेत.

हृषीकेशला चव्हाण हा विदर्भातून द्वितीय आल्याने बंजारा समाजाच्या शिरावर मानाचा तुरा रोवला गेला आहे.

त्याच्या सत्कार प्रसंगी  पिरूसिंग राठोड,  नायक खरबी, डॉ. गणेश चव्हाण, भरकाडीकार, डॉ. पूनमताई चव्हाण, श्री. सतीश आडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

हृषीकेशच्या यशाबद्दल संपूर्ण बंजारा समाजात आनंद व्यक्त होत आहे. त्याला नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते  होमसिंग पवार यांच्यासह विविध स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *