कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरला झोडपले

उत्तर महाराष्ट्र

• मारहाणीचा घटना सीसीटिव्हीत कैद


• तिघांना अटक


सिटीझन मिरर वार्ता,दिनांक ४ ऑगस्ट

नाशिकमधील अंबड लिंक रोडवरील एका खासगी (ग्लोबल हॉस्पिटल) रुग्णालयात महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईक व मित्र मंडळींनी रूग्णालयाची तोडफोड करून एका डॉक्टरला  झोडपून काढले.या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समोर आल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ग्लोबल हॉस्पिटलमध्ये  चार दिवसांपूर्वी महिला रुग्ण दाखल झाली होती. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. महिला रुग्ण करोनाबाधित होती की नाही याबाबत स्पष्टता झालेली नाही. अनामत म्हणून भरलेले पैसे देखील डॉक्टरांनी परत केले नाही. यावरून मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.यावरून संतापलेल्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरला मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फूूूूटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *