विवाहितेचा खून प्रकरणात सासू-सासऱ्यांसह दिलं दिरानीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

क्राइम जळगाव

जळगाव, दिनांक ४ ऑगस्ट

आशाबाबा नगर परिसरातील शामराव नगर येथील सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेच्या खून प्रकरणात सासरे भगवान कौतिक सोनवणे, सासू प्रमिला सोनवणे, दिर योगेश भगवान सोनवणे व दिरानी स्वाती योगेश सोनवणे यांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

आशाबाबा नगर येथील सोनाली सोनवणे यांचा जळून मृत्यू झाल्याची घटना १० जुलै रोजी घडली होती. यासंदर्भात रामानंद नगर पोलिस ठाणे येथे मयत विवाहितेच्या वडिलांनी तक्रार दिल्यावरून तीन दिवसानंतर १३ जुलै रोजी विवाहितेची आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले विवाहितेचे पती नरेंद्र सोनवणे, यांच्यासह सासू-सासरे,दिलं,दिव्यांनी व नणंदेविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, विवाहितेची आत्महत्या नसून तिचा खून झाला असल्याचे मयत विवाहितेचे वडील व सैन्य दलात असलेले भाऊ ‌यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी होऊन पोलिसांनी कलम वाढवून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पती नरेंद्र भगवान सोनवणे यांस पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे. या घटनेतील सर्व आरोपी अद्याप फरार आहेत.

दरम्यान, सासरे भगवान कौतिक सोनवणे, सासू प्रमिला सोनवणे, दिर योगेश भगवान सोनवणे व दिरानी स्वाती योगेश सोनवणे यांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी फेटाळून लावला आहे. सरकारतर्फेे न्यायालयात अतिरिक्त्त जिल्हा सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज पाहिले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *