बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे यांना उच्च न्यायालयातून जामीन

क्राइम जळगाव

जळगाव, दिनांक ४ ऑगस्ट

बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. १६ जानेवारी २०२० रोजी व. वा. वाचनालय नजीक असलेल्या गोरजाबाई जिमखाना येथे बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर ललित कोल्हे व पाच ते सात जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात खूबचंद साहित्या हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेनंतर माजी महापौर ललित कोल्हे व सहकारी फरार झाले होते.

दरम्यान, ललित कोल्हे हे महाबळ परिसरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या सरीता माळी यांच्या घरी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ललित कोल्हे यांना अटक केली होती. अटकेनंतर ललित कोल्हे यांनी  जामिनासाठी केलेला अर्ज जळगाव न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला. आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांच्या तक्रारीनुसार त्यांनी ललित कोल्हे यांना दिलेली महागडी कार परत मागितल्याचा राग आल्याने ललित कोल्हे यांनी खंडणी मागत पिस्तुलाचा धाक दाखवून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली होती.घटनेत साहित्या गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक उपचार करून त्यांना मुंबई हलविण्यात आले होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *