पत्नीचा जाळून मारणाऱ्या पोलिसासह पाच आरोपींना अखेर अटक; नणंद अद्याप फरार

क्राइम जळगाव

जळगाव,दिनांक ५ ऑगस्ट

पत्नीचा जाळून खून केल्या प्रकरणी पोलिस कर्मचारी नरेंद्र भगवान सोनवणे यांच्यासह सासरे भगवान सोनवणे,सासू प्रमिलाबाई सोनवणे,दिर योगेश सोनवणे व दिरानी स्वाती सोनवणे यांना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणातील आणखी एक आरोपी नणंद सरला देशमुख या अद्याप फरार आहेत.

आशाबाबा नगर परीसरातील भगवान नगर येथे राहणाऱ्या सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा दिनांक १० जुलै रोजी जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला रामानंद नगर पोलिसांत पती,सासू सासरे,दिर दिरानी व नंणदे विरुद्ध विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र ही आत्महत्या नसून खून आहे अशी तक्रार विवाहितेचे वडील नामदेव तायडे व सैन्य दलात असलेला भाऊ गोविंदा तायडे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली होती. चौकशीअंती पोलिसांनी हुंडाबळी व खुनाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत विवाहितेचा पती नरेंद्र सोनवणे याला पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे. घटना घडल्या पासून आरोपी फरार होते.दरम्यान दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाने चार आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. अखेर पती नरेंद्र भगवान सोनवणे यांच्यासह सासरे भगवान सोनवणे,सासू प्रमिलाबाई सोनवणे,दिर योगेश सोनवणे व दिरानी स्वाती सोनवणे यांना रामानंद नगर पोलिसांनी आज अटक केली आहे. नणंद सरला देेेेशमुख (रा. परभणी) या अद्याप फरार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *