सहकारी संस्थांच्या ऑडीटची छाननी करण्यासाठी लाच घेतांना जिल्हा विशेष लेखा परीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव

• लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने केेेेली कारवाई


• जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल


जळगाव,दिनांक ६ ऑगस्ट

जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या ऑडीटच्या छाननीसाठी ३२ हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा विशेष लेखापरीक्षक रावसाहेब बाजीराव जंगले (वय ४३ या. जळगाव) यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार व त्यांचे सहकारी यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे ऑडिट पूर्ण करून ते छाननी करण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १ रावसाहेब जंगले यांच्याकडे सादर केले होते. त्यांनी  या कामासाठी ३१ जुलै रोजी ५२ हजाराची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुुुुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील,मृदुला नाईक, हवालदार दीपक कुशारे, हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक एकनाथ बावीस्कर, चालक पोलीस नाईक दाभोळे यांच्या पथकाने काल बुधवारी रात्री १० वाजता प्रशासकीय इमारतीत रचलेल्या सापळ्यात जिल्हा विशेष लेखापरीक्षक जंगले ३२ हजाराची लाच स्वीकारताना अलगत अटकले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *