सुप्रीम कोर्टातून विजय माल्या खटल्यातील महत्वपूर्ण कागदपत्रे गायब

राष्ट्रीय

   न्यायालयाच्या अवमान केल्याप्रकरणी विजय माल्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे खटला


सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ६ जुलै 

­­  न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्या यांच्या विरोधात सुरू असलेल्या पुनर्विचार याचिकेतील महत्त्वपूर्ण कागदपत्रेे सर्वोच्च न्यायालयातून गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे याचिकेवरील सुनावणी २० ऑगस्टपर्यंत टाळण्यात आली आहे.


भारतीय बँकांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावून फरार झालेला उद्योगपती विजय माल्ल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाऊन स्वत:ची संपत्ती कुटुंबाच्या नावावर केली होती.मल्ल्याला २०१७ साली सर्वोच्च न्यायालयाचा  अवमान केल्याप्रकरणी सन २०१७ मध्ये दोषी ठरवले होते. यावर विजय माल्याने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

विजय मल्ल्याची याचिका उशिराने लिस्ट केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने रजिस्ट्रीवर नाराजी व्यक्त केली होती. २०१७ साळी दिलेल्या आदेशावरील पुनर्विचार याचिका आता सुनावणीस आली होती. ही याचिका आतापर्यंत का न्यायालयासमोर आली नव्हती अशी विचारणा रजिस्ट्रीकडे करण्यात आली होती. तसेच यावर दोन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले होते.या खटल्यासंदर्भातील कागदपत्र गहाळ झाल्यामुळे गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होऊ शकली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *