कोरोना : जिल्ह्यात आज ३२१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह ; जिल्ह्याची रुग्णसंख्या झाली १३०८७

जळगाव

• सर्वाधिक ७९ रुग्ण जळगाव शहरातील


          • आज २०० रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील बरेे झालेले रुग्णांची संख्या झाली ९१४५


जळगाव,दिनांक ७ ऑगस्ट

जळगाव जिल्ह्यात कोरोना संक्रमीत रुग्णांची दिवसेंदिवस वाढतच असली तरी कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील समाधानकारक आहे. आज ३२१ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून सर्वाधिक ७९ रुग्ण जळगाव शहरातील आहेत. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १३०८७ थोड्या मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी ९१४५ रुग्ण कोरोना मुक्त झाले ही समाधानाची बाब आहे. आज २०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरणा मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५८४ एवढी झाली आहे.

आज जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:-

जळगाव शहर ७९,जळगाव ग्रामीण १२,
भुसावळ १९,अमळनेर १५,चोपडा २०,
पाचोरा १८,भडगाव ००,धरणगाव १८,
यावल ०९,एरंडोल ५१,जामनेर १५
रावेर ०६,पारोळा ०३,चाळीसगाव १८,
मुक्ताईनगर ३६,बोदवड ०१
दुसर्‍या जिल्ह्यातील-०१ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *