बिहार निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी मुंबई पोलिसांवर आरोप करणारे भाजपा नेते महाराष्ट्र द्रोही

राज्य

• सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात काँग्रेसचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

मुंबई,दिनांक ७ ऑगस्ट

सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजपा नेत्यांवर काँग्रेसने जोरदार हल्ला चढविला आहे.काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला. “बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे,” असा हल्लाबोल सावंत यांनी केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असताना या प्रकरणात बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपासाविषयी आरोप केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *