शेतकरी विरोधी धोरणाचा धिक्कार करत लोकसंघर्ष मोर्चाच्या किसान मुक्ती आंदोलनाने वेधले जळगावकरांचे लक्ष

जळगाव

• सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यापासून जळगाव शहरात गुंजला आंदोलनकर्त्यांचा आवाज


जळगाव, दिनांक ९ ऑगस्ट

क्रांती दिन व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधुन लोकसंघर्ष मोर्चाने केलेल्या किसान मुक्ती आंदोलनाने सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यापासून जळगाव शहरात केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा धिक्कार करत आसमंत दणाणून सोडले.

देशभरातील किसान आंदोलनांनी मिळून राष्ट्रीय पातळीवर संघटीत झालेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध व त्यांच्या मागण्या व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी “किसान बचाव कॉर्पोरेट भगाव” चा नारा देत देशव्यापी किसान आंदोलनाची हाक दिली होती. या देशव्यापी तिचा न मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने जळगाव शहर व तालुक्यासह,चोपडा ,यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर , बोदवड, अमळनेर,पारोळा चाळीसगाव तालुक्यातील  आदिवासी ग्रामीण भागातील गावागावांत कोरोनाचे नियम पाळत व शारीरिक अंतर पाळत लोकांनी आपला शेती आणि आपल्या जल,जंगल,जमीन या नैसर्गिक संसाधानांवरचे हक्क राखण्या साठी केंद्र शासनाने शेती व आदिवासींच्या विरोधात केलेल्या कायद्यातील बदलांचा निषेध करत हे कायदे रद्द व्हावेत या साठी आंदोलन केले.

जळगाव शहरात शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन कर त्यांनी केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

आंदोलनात मुकुंद सपकाळे, विनोद देशमुख, सचिन धांडे, संजय पवार, भारत ससाणे, प्रमोद पाटील, भरत कर्डिले, किरण वाघ, अमोल कोल्हे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनात आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेश परिधान करून केलेल्या नृत्याने जळगावकरांचे लक्ष वेधले होते.

आंदोलन करताना जिल्हापेठ पोलिसांनी कलम ६८ अन्वये अटक करून तासाभराने कलम ६९ नुसार सुटका केली. आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हा पेठचे  पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *