अमळनेरकरांनो.., कोरोना विरुद्धचा स्वातंत्र्यलढा काळजीपूर्वक लढण्याची गरज : भीती नको, जिद्द ठेवा..! आपल्याला लढाई जिंकायची आहे.

जळगाव

• सर्वाधिक ९६ रुग्ण आढळल्याने अमळनेर तालुका हादरला


जळगाव, दिनांक ९ ऑगस्ट

        ­“ जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून आज रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सर्वाधिक ९६ रुग्णअमळनेर तालुक्यात आढळून आले आहेत. आज देशभरात ऑगस्ट क्रांती दिन साजराा होत आहे. इंग्रजांंच्या तावडीतून देशाला स्वातंत्र्य मिळावेेे म्हणून मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून आजच्याच दिवशी चले जाव चा नारा दिला होता. गांधीजींच्या आदेशावरून संपूर्णण देशभरात विविध ठिकाणी स्वातंत्र्याची आंदोलन पेटले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात इंग्रजांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो लोकांनी स्वातंत्र्याची क्रांती केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात जळगाव जिल्ह्याचे योगदान खूप महत्त्वाचे होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व अमळनेर शहर व तालुक्याने केले होते. या घटनेला आज बरोबर ७८ वर्ष पूर्ण झालेे आहेत. आज पुन्हा एकदा अमळनेरकरांना स्वातंत्र्यलढा लढायचा आहे. मात्र, पूर्वी इंग्रजांच्या रुपाने मानवी शत्रु समोर होता. आता कोरोनाच्या रूपाने अदृश्य शक्ती विरुद्ध  अमळनेरकरांना लढायचे आहे. ”


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजांच्या जुलमातून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर ‘चले जाव’चा नारा देताच संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याची मशाल पेटली. मात्र जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्याची आग प्रज्योत होऊ शकली नव्हती. साने गुरुजींच्या लक्षात ही बाब लक्षात येताच त्यांनी “संपूर्ण देश पेटला असताना माझे अमळनेर शांत का” असा संदेश देतात अमळनेर शहर इंग्रजांच्या विरोधात पेटून उठले. स्वातंत्र्य सेनानी क्रांती विरांगणा लीलाताई पाटील, उत्तमराव पाटील यांनी साने गुरुजींच्या हाकेला प्रतिसाद देत आंमळनेर शहर व तालुक्यात इंग्रजांच्या विरुद्ध आक्रोश आंदोलन करा जळगाव जिल्ह्याचे आता चंद्र आंदोलनाला बळकटी दिली. आज हा इतिहास पुन्हा आठवण्याचे कारण कोरोना या अदृश्य विषाणूचे संकट होय. आज संपूर्ण देशभरात क्रांती दिन साजरा होत असतानाच अमळनेर शहरात महाराष्ट्रात कोणाचा फायदा प्रचंड गतीने वाढला आहेजिल्ह्यातील सर्वाधिक ९६ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने स्वातंत्र्यलढ्यातील इतिहास आजा झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारतात कोरोना विषाणूचा उपचार प्रचंड प्रमाणात असून अमेरिका, ब्राझील पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण भारतात आढळले आहेत. देशाचा विचार केल्यास कोरोनाचा संसर्ग प्रचंड गतीने वाढला आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरला आहे. कोरोनामुळे वाढत्या मृत्यूदराने संपूर्ण देशाचे लक्ष जळगाव जिल्ह्याकडे वेधले गेले. जळगाव शहरासह अमळनेर व  भुसावळ येथे कोरोना विषाणूचा  हाहाकार चिंतेचा विषय झाला. जिल्हा प्रशासनाने या शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला. असे असतानाही जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची आकडेवारी अत्यंत भयावह स्थितीत आहे. मात्र, अमळनेरकरांनी कोरोनावर मात करण्यासाठी दाखविलेल्या सकारात्मक प्रतिसाद निश्‍चितपणे अभिनंदनास पात्र आहे. अमळनेर शहरातून कोरोना हळूहळू हद्दपार होईल असा विश्वास निर्माण होत असतानाच आज रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्वाधिक ९६ रुग्ण अमळनेर शहरात आढळून आल्याने हा चिंतेचा विषय आहे. याचमुळे ज्याप्रमाणे इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्यलढ्यात आम्हाला निर्णय जिल्ह्याचे नेतृत्व केले, तशाच पद्धतीने आता कोरोना विरुद्धच्या लढाईत अमळनेरकर जिल्ह्याचे नेतृत्व करून जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करतील का..? असा प्रश्न पडू लागतो.

आज जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या खालील प्रमाणे:-

 

जळगाव ७७, जळगाव ग्रामीण १४,भुसावळ १५, अमळनेर ९६,  चोपडा ५६,पाचोरा ३३, भडगाव १३, धरणगाव २७,यावल ०४, एरंडोल १८,, जामनेर ३१, रावेर १८, पारोळा २४, चाळीसगाव ०९, मुक्ताईनगर १३, बोदवड ०६, अन्य जिल्ह्यातील ००,

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १४३४३ इतकी झाली आहे.आज ०७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ६०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *