व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार ; ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले

आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु असताना झाली घटना


सिटीझन मिरर वार्ता,दिनांक ११ ऑगस्ट

“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांची पत्रकार परिषद सुरु असताना आज व्हाइट हाऊसबाहेर गोळीबाराची घटना घडली. बाहेर गोळीबार होताच तिथे उपस्थित असलेल्या सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटसनी ट्रम्प यांना या घटनेची माहिती दिली व त्यांना व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षातून बाहेर नेले. परिस्थितीवर नियंत्रण मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प  पुन्हा मीडिया हाऊसमध्ये आले व त्यांनी झालेल्या घटनेची माहिती दिली.”


व्हाईट हाऊस मध्ये पत्रकार परिषद सुरू होती. अचानक व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळीबार सुरू झाला.सीक्रेट सर्व्हिसच्या एजंटांनी तातडीने ट्रम्प यांना माहिती देऊन त्यांना सुरक्षित स्थळी नेले.

परिस्थितीवर नियंत्रण मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प मीडिया हाऊसमध्ये आले.­व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार झालाय. पण परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणालातरी रुग्णालयात घेऊन गेले आहेत. त्या व्यक्तीची स्थिती कशी आहे, ते मला माहित नाही. असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी सिक्रेट सर्व्हीसनने तात्काळ उचललेल्या पावलांबद्दल त्यांचे कौतुक केले. पत्रकार परिषद सुरु झाल्यानंतर काही मिनिटात ट्रम्प यांना पत्रकार कक्षातून बाहेर नेण्यात आले. पत्रकार परिषद मध्येच रोखण्यामागे काय कारण आहे? त्याबद्दल कुठलीही माहिती लगेच देण्यात आली नव्हती. नंतर ट्रम्प यांनी स्वत:च गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली.

Leave a Reply