महेंद्रसिगं धोनीची आंतररष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती

क्रीड़ा

• धोनीने स्वत: इंस्टाग्राम पोस्ट करुन निवृत्तीची  दिली माहिती


सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १५ ऑगस्ट

      “करोडो क्रिकेप्रेमींचा आवडता क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.  इंस्टाग्राम पोस्ट करुन धोनीने स्वत: क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी धोनी हा आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. महेंद्रसिंह धोनीने आपल्याला दिलेल्या समर्थन आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार मानले आहेत.”

          महेंद्रसिंग धोनीने आपल्या इंस्टाग्रामवर आज शनिवारी (१५ ऑगस्ट २०२०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोस्ट करुन निवृत्तीची घोषणा केली आहे.आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये धोनीने म्हटले, “तुमच्या सर्वांचे प्रेम आणि समर्थन याबद्दल धन्यवाद” या पोस्टसोबत धोनीने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. 

धोनीने  २००४ साली बांगलादेशविरुद्ध खेळत आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात केली होती. धोनीने आतापर्यंत ९० टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. याशिवाय त्याने ३५० वन-डे मॅचेस आणि ९८ टी-२० मॅचेस खेळल्या आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो आयपीएल खेळत राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही माहिती दिली होती की, धोनी २०२२ आयपीएल सुद्धा खेळेल.

भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक, जगातल्या सर्वोत्तम फिनिशरपैकी एक, आक्रमक बॅट्समन आणि निष्णात विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी साधारण वर्षभरापूर्वी वर्ल्ड कपची सेमी फायनल खेळला.