वाघझिरा येथील वन रक्षकांच्या मोटरसायकली अज्ञातांनी जाळल्या

क्राइम जळगाव

• सागवान तस्करीतील आरोपींनी मोटारसायकली जाळल्याचा संशय


• यावल पोलिसांत गुन्हा दाखल


• आरोपींवर कठोर कारवाई करण्याची कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मागणी


जळगाव, दिनांक १६ ऑगस्ट

वाघझिरा वन विभागातील कार्यरत दोघा वनरक्षकांच्या खाजगी मोटरसायकल्स रविवार, दिनांक १६ ऑगस्ट रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी जाळून टाकल्या आहेत. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तीन महिन्यापूर्वी सागवान तस्करांविरुद्ध झालेल्या कारवाईमुळे सूडबुद्धीने आरोपींनी मोटरसायकली जाळल्याचा संशय आहे.या प्रकाराचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावल परिषद अंतर्गत वाघझिरा उत्तर या वनक्षेत्रात कार्यरत असलेले वनरक्षक संदीप तात्याराव पंडित  व त्यांचे सहकारी वनरक्षक राकेश  सुभाष निकुंभे हे वनक्षेत्रात त्यांच्या खाजगी मोटर सायकलने गस्त घालून वागझिरा वनविभागाच्या मुख्यालयातील निवासस्थानी जेवण करून झोपले असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास वनरक्षक ईश्वर बलदेव मोरे ‌ यांनी जोराने दरवाजा ठोठावून आवाज देत तुमच्या मोटार सायकली जळत असल्याचे सांगितले ‌.

वनरक्षक संदीप पंडित व राकेश निकुंभ यांनी दरवाजा उघडून पाहिले असता त्यांच्या निवासस्थानाच्या ओट्यावर लावलेल्या ‌ मोटारसायकली जळत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी वनरक्षक ईश्वर मोरे यांच्यासह मोटरसायकली पाणी टाकून विझवल्या.

या घटनेत वनरक्षक संदीप पंडित यांच्या मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल क्रमांक एम.एच. २२ ए.एफ.५४८३, राकेश निकुंभे यांच्या मालकीची बुलेट क्रमांक एम.एच.३९ए.एफ.७३५५ जळाल्या आहेत.

सागवान तस्करी प्रकरणात कारवाई झालेल्या आरोपींवर संशय:-    वाघझिरा या.यावल येथे मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करताना  रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपींनी प्राणघातक हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणला होता. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वनरक्षक राकेश निकुंभे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध  गुन्हा नोंदविण्यात आला होता. याची खुन्नन मनात बाळगून मोटर सायकली जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सागवान तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या  ईश्वर लकड्या बारेला, गज्या हरसिंग पावरा, लकडया चैैैनसिंग बारेला, भगवान चैनसिंग बारेला, शरीफ अकबर तडवी, चंदन बुटासिंग बारेला, शाकीर कुर्बानसिंग तडवी यांनी त्यांच्या विरुद्ध झालेल्या कारवाईचा राग मनात बाळगून वनरक्षकांच्या मोटर सायकली जाळल्याची गुप्त माहिती मिळाली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

वरिष्ठांनी भेट देऊन केली पाहणी

वागझिरा येथील वनरक्षकांच्या मोटरसायकल झाडण्यात आल्याची माहिती मिळताच यावल वनविभागाचे वनपाल एस.आर. पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत पो.क. सचिन तडवी, वाहनचालक भरत बाविस्कर हे उपस्थित होते. धुळे येथील विभागीय वन अधिकारी (दक्षता), जळगावचे उपवनसंरक्षक, यावल पश्चिम वनक्षेत्राचे  वनपाल, रेंज टॉपचे अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याची कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मागणी

वाघझिरा येथील वनरक्षकांच्या मोटरसायकली जाळून त्यांच्यावर व वन कर्मचाऱ्यांवर दहशत बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरुद्ध ‌ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी‌ व जळगाव जिल्हाध्यक्ष राजेंद्र तायडे यांनी केली आहे.

‌‌‌‌‌‌‌‌‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *