बबड्या एक जबाबदार नागरिक आहे.. ; मुंबई पोलिसांचे ट्विट उतरले लोकांच्या पसंतीस

मनोरंजन मुंबई

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २० ऑगस्ट

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या “अग्गंबाई सासुबाई या मालिकेतील ‘बबड्या’ हे पात्र  चांगलेेच लोकप्रिय झालेे आहे.‌ आईच्या लाडाने उचापत्या करत चुकांमागून चुका करणारा बबड्या सुधारणार तरी कधी असा प्रश्न रसिकांना मालिका पाहतांना पडतो. मात्र, मुंबई पोलिसांनी ‘बबड्या’ ला जबाबदार नागरिक ठरविले आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी केलेले  ट्विट लोकांना चांगलेच आवडले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गरजे शिवाय व कामाशिवाय घराबाहेर पडू नये  यासाठी मुंबई पोलिस सतत प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करणाऱ्या मुंबई पोलिसांनी अभिनव शक्कल वापरून बबड्याचा मास्क घातलेला फोटो टाकून  कथानकात ‘ट्विस्ट’ आहे ! “ बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही. परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे.” असे ट्विट केले आहे.

या ट्विटच्या माध्यमातून मास्क वापरत जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी लोकांना केले आहे. पोलिसांचे हे ट्विट मुंबईकरांना चांगलेच भावले आहे.

“अग्गंबाई सासुबाई ” या मालिकेत सोोहम उर्फ’बबड्या’चे पात्र आशुतोष पत्की हा अभिनेता साकारत आहे. आईच्या लाडावलेल्या मुलाचं पात्र साकारतांना आपल्या अभिनयातून त्याने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *