यवतमाळ जिल्ह्यात आज ५५ रुग्णांची नव्याने भर तर ४२ कोरोना मुक्त

विदर्भ

यवतमाळ | राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)

दिनांक २२ ऑगस्ट

 

वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ४२ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ५५ पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

आज (दि. २२) नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या ५५ जणांमध्ये ३४ पुरुष आणि २१ महिला आहेत. यात पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, आर्णि शहरातील दोन पुरुष, वणी शहरातील एक महिला व वणी येथील दोन महिला व एक पुरुष, महागाव शहरातील तीन पुरुष, दिग्रस शहरातील तीन पुरुष व पाच महिला, दिग्रस शहरातील नागोबा मंदीर येथील एक पुरुष,पुसद शहरातील दोन महिला, पुसद शहरातील गायमुख नगर येथील दोन पुरुष, स्टेट बँक चौक येथील एक पुरुष व एक महिला, पुसद तालुक्यातील जामबाजार येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील चार पुरुष व तीन महिला, यवतमाळ शहरातील पिंपळगाव येथील एक महिला, तलावफैल येथील एक पुरुष, सिव्हील लाईन पिस्ता शॉप येथील दोन पुरुष, अग्रवाल ले-आऊट येथील दोन महिला व एक पुरुष, वंजारी फैल येथील एक पुरुष, यवतमाळ येथील तीन पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील मोझर येथील दोन महिला व एक पुरुष, झरी शहरातील मुकुटबन येथील आरसीसीपीसी कंपनीतील चार पुरुष, मानोरा ग्रामीण पांचाळा येथील एक महिला आणि दारव्हा शहरातील एक पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१३ ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर १९५ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६७७ झाली आहे. यापैकी १७०६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ६३ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १५५ जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी १५० नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ४०८५२ नमुने पाठविले असून यापैकी ३९९९४ प्राप्त तर ८५८ अप्राप्त आहेत. तसेच ३७४१७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *