समाजात द्वेष पसरवणाऱ्या लोकशाही द्रोही प्रवीण तरडे यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- भिम टायगर सेना

विदर्भ

पुसद| राजेश ढोले,दिनांक २५ ऑगस्ट

संविधानावर गणपती मांडून लोकशाहीला धार्मिकतेकडे नेणारे कृत्य हे देशद्रोहाचे असल्याने या घटनेचा तीव्र निषेध करीत आरोपी प्रवीण तरडे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करावे लागेल. असा इशारा भिम टायगर सेनाने दिला आहे.

भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

भारतीय राज्यघटना देशासाठी सर्वोच्च असून संविधान धर्मनिरपेक्ष आहे. मात्र पुणे येथील रहिवासी असलेला आरोपी प्रवीण तरडे याने त्याच्या घरी भारतीय संविधानावर गणपतीची स्थापना केली व त्या संबंधीची पोस्ट स्वतःचे फेसबुक खात्यावर पोस्ट करून सोशल मीडियावर दिनांक २२ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर केली.
राज्यघटनेप्रमाणे संविधान व भारत धर्मनिरपेक्ष आहे. धार्मिक कार्यक्रमात राज्यघटना वापरता येत नाही, किंवा संविधान हे कोणत्याही धर्माचा धर्मग्रंथ नाही. तरीही  जाणीवपूर्वक आरोपी दिग्दर्शक प्रवीण तरडे याने गणपती उत्सवाच्या या धार्मिक कार्यक्रमांमध्ये संविधानाचा वापर केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवीण तरडे याने समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि जाणीवपूर्वक केलेले देशद्रोही कृत्य केले आहे, त्यामुळे आम्ही या कृत्याचा जाहीर निषेध करीत आहोत आणि देशात लोकशाहीचे राज्य असल्यामुळे लोकशाहीतील कायद्या प्रमाणे दिग्दर्शक प्रवीण तरडे याच्यावर तीन दिवसाच्या आत देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल करावा अन्यथा भिम टायगर सेना आपल्या स्टाईलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल याची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.आंदोलनादरम्यान आमच्या जीवितास काही धोका किंवा हानी निर्माण झाल्यास यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देणारे निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद यांना आज देण्यात आले.

या निवेदनावर भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, पंचायत समिती सदस्य देवेंद्र खडसे, बिरसा मुंडा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे, संजय शेळके, प्रभाकर खंदारे, सुरेश राठोड, आकाश ढवसे, गौतम जाधव, जनार्धन झोडगे, अक्षय बनसोडे, आकाश वाढवे, गौतम समीर खान, गजानन कांबळे, विनायक जोगदंडे, राहुल काजळे, किरण खंदारे, विलास बनसोड, विनोद जाधव, प्रीतम आळणे, दिपक गायकवाड, गौतम सोनवणे, गजानन कांबळे, अनिकेत कांबळे, राजकुमार पठाडे, प्रदीप धुळे, देवेंद्र खडसे, दत्ता कांबळे, शरद भगत, उत्तम शिकारे, मधुकर सोनवणे यांच्यासह संविधानाला मानणाऱ्या तमाम नागरिकांच्या सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *